Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 13 April 2025
webdunia

राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण - अजित पवार

10 ministers and 20 MLAs in the state infected with corona in Maharashtra
, शनिवार, 1 जानेवारी 2022 (12:16 IST)
राज्यात तब्बल १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोना झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
 
राज्यात ओमिक्रॉन आणि कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे अशात अजित पवार यांनी दिलेल्या माहितीने चिंतेत भर पडली आहे. त्यांनी शौर्यदिनानिमित्त भिमा-कोरेगाव याठिकाणी उपस्थित असताना ही माहिती दिली. 
 
कोरोनानंतर आता ओमिक्रॉन व्हेरीअंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून निर्बंध लावले जात आहेत. लग्न सोहळे, राजकीय सभा आणि गर्दीच्या ठिकाणी होणाऱ्या संसर्गामुळे राज्य सरकारने नुकतेच कडक निर्बंध लागू केले आहे. 
 
कोरोना संसर्ग झालेल्या अनेक आमदार, मंत्री विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित होते. तसेच वेगवेगळ्या लग्न समारंभांना देखील या मंडळींनी हजेरी लावली होती. अशात या राजकीय लोकांच्या संपर्कात हजारो लोक आले असतील. त्यामुळे ही सर्व राजकीय मंडळी कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरू शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वैष्णोदेवी मंदिरात चेंगराचेंगरी का झाली, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि DGP यांनी सांगितले अपघाताचे कारण