Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 13 April 2025
webdunia

मुंबई पोलिसांसाठी स्टार इंडिया, प्रोजेक्ट मुंबईकडून १० हजार पीपीई कीट

10 thousand
, मंगळवार, 12 मे 2020 (09:10 IST)
कोरोना विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी मुंबई पोलीस दल सक्षमतेने उभे आहे. त्यांचे कोरोना व्हायरसपासून संरक्षण व्हावे, स्टार इंडिया, डिस्ने व हॉटस्टारचे चेअरमन उदय शंकर आणि प्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, शिशिर जोशी यांनी १० हजार खाकी रंगाचे पीपीई कीट भेट दिले.
 
कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी निश्चितच पोलीस विभागाला हे कीट अतिशय महत्त्वपूर्ण ठरतील असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. तसेच आतापर्यंत मिळालेली ही सर्वात मोठी भेट असून त्यांनी या भेटीबद्दल स्टार इंडिया व प्रोजेक्ट मुंबईचे गृह विभागाच्या वतीने आभार व्यक्त केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनाचे १२३० नवीन रुग्ण; राज्यात एकूण २३ हजार ४०१ रुग्ण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती