Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे विभागातील 14 लाख 57 हजार 187 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे विभागातील 14 लाख 57 हजार 187 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
, गुरूवार, 3 जून 2021 (09:09 IST)
पुणे जिल्हा 
पुणे विभागातील 14 लाख 57 हजार 187 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 15 लाख 69 हजार 282 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 80 हजार 845 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 31 हजार 250 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.99 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 92.86 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
 
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 15 हजार 328 रुग्णांपैकी 9 लाख 73 हजार 783 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 24 हजार 713 आहे. कोरोनाबाधित एकूण 16 हजार 832 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.66 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.91 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 67 हजार 792 रुग्णांपैकी 1 लाख 41 हजार 461 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 117 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 214 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 52 हजार 124 रुग्णांपैकी 1 लाख 42 हजार 410 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 717 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 997 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 19 हजार 374 रुग्णांपैकी 1 लाख 4 हजार 462 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार 462 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 450 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 14 हजार 664 रुग्णांपैकी 95 हजार 71 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 836 आहे. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 757 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 6 हजार 21 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 524, सातारा जिल्ह्यात 1 हजार 536, सोलापूर जिल्ह्यात 559, सांगली जिल्ह्यात 1 हजार 7 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 395 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 9 हजार 559 आहे. पुणे जिल्हयामध्ये 3 हजार 621, सातारा जिल्हयामध्ये 2 हजार 15, सोलापूर जिल्हयामध्ये 942, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 452 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 529 रुग्णांचा समावेश आहे.
 
विभागातील लसीकरण प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 27 लाख 16 हजार 286, सातारा जिल्ह्यामध्ये 7 लाख 40 हजार 430, सोलापूर जिल्हयामध्ये 5 लाख 61 हजार 778, सांगली जिल्हयामध्ये 7 लाख 3 हजार 53 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 11 लाख 63 हजार 129 नागरिकांचा समावेश आहे.
 
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आतापर्यत विभागामध्ये एकुण 88 लाख 10 हजार 456 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 15 लाख 69 हजार 282 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘सीरम’मध्ये कोव्होव्हॅक्सची प्रायोगिक निर्मिती सुरु