Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत बुधवारी 16 हजार 420 कोरोना रुग्णांची नोंद

webdunia
बुधवार, 12 जानेवारी 2022 (22:06 IST)
मुंबईत गेले तीन दिवस कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत असताना बुधवारी  पुन्हा एकदा मुंबईचा कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढला आहे. मुंबईत बुधवारी 16 हजार 420 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज मृतांची संख्याही वाढली आहे. 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या चोवीस तासात 14 हजार 649 जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. सध्या राज्यात 1 लाख २ हजार 282 सक्रिय रुग्णसंख्या आहे.
 
मुंबईत बरं झालेल्या रुग्णांचा दर 87 टक्के इतका आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर 36 दिवसांवर आहे.  वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. शिवाय मास्क सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक असल्याचं महापौरांनी सांगितलं आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिद्धार्थ: सायना तू माझ्यासाठी चॅम्पियन, तुला दुखावण्याचा हेतू नव्हता, मला माफ कर