दोन दिवसात राज्यात तब्बल ६२ कोटी ५५ लाख रुपयांची दारू खरेदी केली आहे. राज्यात सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात १६.१० लाख लीटर दारूची विक्री केल्याची माहिती राज्याच्या उत्पादन शुल्क आयुक्त कार्यालयाने दिली आहे.
राज्यात एकूण १० हजार ८२२ परवाना असलेल्या दारूच्या दुकानांपैकी ३ हजार ५४३ दारूची दुकाने सोमवारपासून उघडण्यात आली. राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता उर्वरित ३३ जिल्ह्यात दारू विक्री करण्याची परवानगी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने सोलापूर, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, नागपूर या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी दारू विक्री करण्यास नकार दिला.