राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात गुरुवारी १६५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात २ कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के एवढा आहे. तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०१,३६,६१४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,७७,४२९ (०९.८३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात १५७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आजपर्यंत एकूण ७७,२८,६२८ कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के इतके झाले आहे. तसेच राज्यात एकूण ९६१ ॲक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात बुधवारी १८६ रुग्ण सापडले होते. त्यात आज थोडीशी घट होऊन १६५ रूग्णांची नोंद झाली आहे. याबरोबरच काल राज्यात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. परंतु आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.