राज्यात कोरोनाचा नवा वेरिएंट डेल्टा प्लसचे देखील रूग्ण आढळून येतात. नुकंतच मुंबईच्या कांदिवलीतील एका सोसायटीमध्ये 1-2 नव्हे तर 17 कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. एकाच सोसायटीमध्ये 17 रूग्ण आढळल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
कांदिवली पश्चिम येथील वीणा गीत संगीत गंगोत्री यमुनोत्री बिल्डिंगमध्ये 17 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. एकाचवेळी 17 जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या बिल्डिंगला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे.
कांदिवलीत सापडलेले हे 17 पैकी 10 रुग्ण बरे झाले असल्याची माहिती आहे. तर अजूनही सात रूग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कांदिवली राहणाऱ्या नागरिकांच्या चिंतेत भर म्हणजे मुंबई महापालिकेला 5 डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत.