Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात 3,164 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

राज्यात  3,164 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी
, शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (08:09 IST)
राज्यात कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची  संख्या देखील वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या कमी आहे. त्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात  3,105 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर3,164 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
 
राज्यात आतापर्यंत 63 लाख 74 हजार 892 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery rate) 97.27 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 50 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 117 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.
 
सध्या राज्यात 36 हजार 371 रुग्णांवर उपचार सुरु  आहेत.राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 89 लाख 10 हजार 764 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 53 हजार 961 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 42 हजार 110 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1,355 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुण्यात पोलीस भरती परिक्षेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त, 2744 हजार जणांचा फौजफाटा तैनात