Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात ३,५५८ नवे करोनाबाधित रुग्ण दाखल

राज्यात ३,५५८ नवे करोनाबाधित रुग्ण दाखल
, सोमवार, 11 जानेवारी 2021 (08:16 IST)
राज्यात रविवारी ३,५५८ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३४ बाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, २,३०२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे.
 
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात  आढळून आलेल्या नव्या ३,५५८ रुग्णांमुळे एकूण रुग्णांची संख्या १९,६९,११४ झाली आहे. तर २,३०२ रुग्ण बरे झाल्याने एकूण १८,६३,७०२ रुग्ण बरे झाले आहेत. तसेच ३४ मृतांच्या संख्येमुळे करोनामुळं मृत्यू झालेल्यांची संख्या ५०,०६१वर पोहोचली आहे. तसेच सध्या राज्यात ५४,१७९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
 
दरम्यान, पुणे शहरात दिवसभरात २६४ करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे अखेर रुग्णसंख्या १ लाख ८१ हजार ५११ इतकी संख्या झाली आहे. दरम्यान, ७ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ४ हजार ६७९ झाली आहे. २१४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. तर आता पर्यत १ लाख ७४ हजार १४३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माझी सुरक्षा कमी करा, शरद पवार यांची अनिल देशमुख यांच्याकडे मागणी