Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात 3,685 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

राज्यात 3,685 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी
, बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (08:02 IST)
राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवली जात आहे.राज्यात अजुनही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे (Recover Patient) होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. राज्यात मंगळवारी  3 हजार 685 रुग्ण बरे झाले आहेत. तर 3 हजार 530 नवीन कोरोनाबाधित आढळले आहे.

राज्यात 52 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.राज्यात आजपर्यंत 1 लाख 38 हजार 221 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर  2.12 टक्के एवढा आहे.राज्यात आजपर्यंत 63 लाख 12 हजार 706 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.06 टक्के एवढे झाले आहे.

सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 65 लाख 4 हजार 147 इतकी आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 62 लाख 25 हजार 304 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 4 हजार 147 (11.57 टक्के) नमुने पॉझिटिव्ह  आले आहेत.सध्या राज्यात 2 लाख 96 हजार 176 व्यक्ती गृहविलगिकरणात आहेत.तर, हजार 875 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत.राज्यात आज रोजी एकूण 49 हजार 671अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हरवलेला अँड्रॉइड फोन परत मिळवण्यासाठी या सोप्या गोष्टी लक्षात ठेवा