Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात ३,८८० नवीन कोरोना रुग्णांची नोंद

राज्यात ३,८८० नवीन कोरोना रुग्णांची नोंद
, शुक्रवार, 18 डिसेंबर 2020 (09:49 IST)
राज्यात गुरुवारी ३,८८० नवीन रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८,८४,७७३ झाली आहे. राज्यात गुरुवारी एकूण ६०,९०५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ६५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४८,४९९ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे.
 
राज्यात  ६५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई १०, ठाणे ३, नवी मुंबई मनपा ३, नाशिक ४, अहमदनगर ४, पुणे ५, सातारा ६, औरंगाबाद ५, नागपूर ६ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ६५ मृत्यूंपैकी ४५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १० मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १० मृत्यू औरंगाबाद ४, नाशिक १, नांदेड १, परभणी १, पुणे १, सातारा १ आणि ठाणे १ असे आहेत.
 
गुरुवारी  ४,३५८ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आता पर्यंत एकूण १७,७४,२५५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१४ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,१९,३३,९५६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,८४,७७३ (१५.७९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,०६,९१४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,०३३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अद्भुत: अंतराळातून हिमालय कसा दिसतो? नासाने बर्फाने झाकलेले हे सुंदर चित्र प्रसिद्ध केले