Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात गुरुवारी ४ हजार २१९ नवीन करोनाबाधित आढळले

राज्यात गुरुवारी  ४ हजार २१९ नवीन करोनाबाधित आढळले
, शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 (08:45 IST)
राज्यात पुन्हा एकदा करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत अधिक आढळून आली आहे.  राज्यात गुरुवारी  ४ हजार २१९ नवीन करोनाबाधित आढळले, तर २ हजार ५३८ रूग्ण करोनातून बरे झाले. याशिवाय, ५५ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे. अजुनही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत असून, करोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही करोनातून बरे होत असलेल्यांच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे.
 
राज्यात आजपर्यंत एकूण ६२,९५,२३६ करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण(रिकव्हरी रेट) ९७.०४ टक्के एवढे झाले आहे.
 
राज्यातील करोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६४,८७,०२५ झाली आहे. आजपर्यंत राज्यात १३८०१७ करोना बाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.सध्या राज्यातील मृत्यू दर २.१२ टक्के एवढा आहे.
 
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,५५,१९,६७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,८७,०२५(११.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात २,९२,५१० व्यक्ती गृहविलगिकरणात आहेत. तर, १,९१९ व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणता आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५०,२२९ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाझेंवर मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयात उपचार होणार