Publish Date: Mon, 16 Aug 2021 (08:12 IST)
Updated Date: Mon, 16 Aug 2021 (08:13 IST)
राज्यात रविवारी 04 हजार 797 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 03 हजार 710 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 61 लाख 89 हजार 933 इतकी झाली आहे. तर राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery rate) 96.86 टक्के झाला आहे. आज 130 कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 35 हजार 039 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण (Case Fatality Rate) 2.11 टक्के इतका झाला आहे.
राज्यात सध्या 64 हजार 219 सक्रीय रुग्ण (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत 5 कोटी 09 लाख 59 हजार 730 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 63 लाख 92 हजार 660 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. राज्यात सध्या 03 लाख 59 हजार 642 लोक होम क्वारंटाईनमध्ये (home quarantine) आहेत. तर 2 हजार 453 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
पुणे शहरातील कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 204 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 244 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात कोरोना बाधित 10 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 06.
– 204 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 490446.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या – 2098.
– एकूण मृत्यू – 8847.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 479501.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 8876.
पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील कोरोनाची आकडेवारी
– दिवसभरात 113 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 079 रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद. तर 24 तासात एकही मृत्यू नाही
– शहरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 267168.
– शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 952.
– एकूण मृत्यू – 4376.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 267168.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी – 5225.