राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असताना गेल्या तीन दिवसात करोना रुग्णाचा आकडा ५ हजारांचा पार जात असल्याचं चित्र आहे.दरम्यान शुक्रवारी हा आकडा काहीसा खाली आला आहे.दिवसभरात राज्यात ४ हजार ६५४ नव्या करोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.तसेच ३ हजार ३०१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.राज्यात आतापर्यंत ६२ लाख ५५ हजार ४५१ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी गेले आहेत.यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.०२ टक्के इतकं झालं आहे.दुसरीकडे राज्यात १७० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे.सध्या राज्यात ५१ हजार ५७४ सक्रिय रुग्ण आहेत.
राज्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे.राज्य सरकारने करोनाच्या तिसऱ्या लाटेचा पार्श्वभूमीवर काळजी करण्याचे आवाहन केले आहे.