राज्यात रविवारी 56 हजार 647 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 51 हजार 356 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णापैकी 39 लाख 81 हजार 658 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 47 लाख 22 हजार 401 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या राज्यात 6 लाख 68 हजार 353 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात सर्वाधिक 1 लाख 9 हजार 254 सक्रिय रुग्ण आहेत. त्याखालोखाल मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूरमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे.
रविवारी 669 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यातील मृतांची संख्या 70 हजारांवर गेली आहे. आजवर एकूण 70 हजार 284 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.49 टक्के एवढा आहे. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 84.31 टक्क्यांवर पोहोचला आहे.
सध्या राज्यात 39 लाख 56 हजार 946 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 27 हजार 735 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 76 लाख 52 हजार 258 नमूने तपासण्यात आले आहेत.