Publish Date: Sat, 03 Jul 2021 (08:55 IST)
Updated Date: Sat, 03 Jul 2021 (08:56 IST)
महाराष्ट्रात शुक्रवारी 8 हजार 753 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर, 8 हजार 385 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 58 लाख 36 हजार 950 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
आरोग्य विभागाने याबाबत प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 60 लाख 79 हजार 352 एवढी झाली आहे. सध्याच्या घडीला राज्यात 1 लाख 16 हजार 867 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
महाराष्ट्रात आज 156 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 22 हजार 353 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.01 टक्के एवढा झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 96.02 एवढा झाला आहे.
राज्यात आतापर्यंत 4 कोटी 20 लाख 96 हजार 506 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 6 लाख 24 हजार 745 लोक होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 472 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.