Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

राज्यात ८ हजार १४२ नवे कोरोनाबाधित दाखल

8 thousand 142
, गुरूवार, 22 ऑक्टोबर 2020 (09:35 IST)
राज्यात बुधवारी ८ हजार १४२ नवे कोरोनाबाधित आढळले असून १८० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच दिलासादायक बाब म्हणजे २३ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाख १७ हजार ६५८वर पोहोचला आहे. यापैकी आतापर्यंत ४२ हजार ६३३ जणांचा मृत्यू झाला असून १४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण रिकव्हर झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.५१ टक्के एवढे झाले आहे. तर मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे.
 
सध्या राज्यात १ लाख ५८ हजार ८५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ८३ लाख २७ हजार ४९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख १७ हजार ६५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच सध्या राज्यात २४ लाख ४७ हजार २९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २३ हजार ३१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रिलायन्स जिओने स्वदेशी वेब ब्राउझर JioPages बाजारात आणला असून, त्या आठ भारतीय भाषांना पाठिंबा देतील