Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट; पिंपरी चिंचवडमध्ये लहान मुलांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सुरु

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट; पिंपरी चिंचवडमध्ये लहान मुलांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सुरु
, मंगळवार, 29 जून 2021 (07:43 IST)
कोरोनाच्या संभाव्य तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर शहरातील लहान मुलांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सुरु करण्यात येणार असून हेल्पलाईन चालविणा-या शालेय विद्यार्थ्यांच्या तीन दिवसीय प्रशिक्षण शिबीरास  सुरुवात झाली. प्रशिक्षण शिबिरात विविध शाळांच्या निवडक विद्यार्थ्यांसह शिक्षक सहभागी होते.
 
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहे. संभाव्य तिस-या लाटेला सामोर जात असताना विविध पातळीवर महापालिका पूर्वतयारी करीत आहे. तिस-या लाटेमध्ये लहान मुले कोरोनाच्या संसर्गामध्ये येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अधिक सजगतेने महापालिकेने पूर्वतयारी सुरु केली आहे. कोरोना संदर्भात विविध माहिती तसेच प्रश्नांची उत्तरे सुलभतेने लहान मुलांना मिळावीत यासाठी महापालिकेच्या वतीने चाईल्ड हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. चाईल्ड हेल्पलाईनचा मुख्य हेतू लहान मुलांमधील कोरोनाबाबतची भीती दूर करणे हा आहे. हेल्पलाईनचे वैशिष्ट्य म्हणजे ही हेल्पलाईन शालेय विद्यार्थ्यांकडून चालविली जाईल. यासाठी महापालिका हद्दीतील विविध शाळांमधील इयता ७ वी ते १० वी मधील काही विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थांना चाईल्ड हेल्पलाईन संदर्भात तसेच कोरोना आजाराबाबत विचारलेल्या प्रश्नांना कशाप्रकारे उत्तरे द्यावीत याबाबात प्रशिक्षणात माहिती देण्यात आली.
 
महापालिकेमार्फत चाईल्ड हेल्पलाईनच्या अनुषंगाने प्रश्नावली तयार करण्यात आली असून हेल्पलाईन चालविणा-या शालेय विद्यार्थ्यांना कोरोना आजार व उपचार याबाबत सविस्तर प्रशिक्षण व माहिती दिली जात आहे. या हेल्पलाईनमध्ये वैद्यकीय अधिका-यांचे सहाय्य देखील राहणार आहे. शिवाय शिक्षक आणि पालकांचे मार्गदर्शन देखील घेतले जाणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्याचा रिकव्हरी रेट 96 टक्क्यांवर, 6,727 नवे रुग्ण