Publish Date: Thu, 25 Nov 2021 (09:16 IST)
Updated Date: Thu, 25 Nov 2021 (09:19 IST)
राज्यातील कोरोना संसर्गाची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरली आहे. मात्र राज्यात अजुनही दररोज हजारांच्या आसपास नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. तर दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे होत असलेल्याच्या तुलनेत कधी कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. राज्यात आज दिवसभरात 1 हजार 043 रुग्ण बरे झाले आहेत. तर 960 नवीन कोरोनाबाधित आढळले आहे.
राज्यात बुधवारी 41 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 40 हजार 807 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत 64 लाख 78 हजार 422 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 97.68 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 49 लाख 51 हजार 994 प्रयोगशाळा चाचण्या घेण्यात आल्या आहेत. राज्यात 84 हजार 261 व्यक्ती गृह विलगिकरणात आहेत. तर, 1084 व्यक्ती संस्थात्मक विलगिकरणात आहेत. राज्यात एकूण 09 हजार 366 अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.