Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

`डेल्टा'चा राज्यातला पहिला मृत्यू

`डेल्टा'चा राज्यातला पहिला मृत्यू
मुंबई , गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (22:43 IST)
महाराष्ट्रात डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झालेल्या मुंबईत पहिल्या बळीची नोंद करण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल समोर आल्यावर महाराष्ट्र सरकारने अनलॉकच्या नियमात बदल केले आहेत. दरम्यान, मुंबईत 11 डेल्टा प्लसचे (delta plus patient) रूग्ण होते. त्यापैकी एकाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
या आधीच्या नियमावलीनुसार संक्रमणाच्या आणि ऑक्सीजन बेड उपलब्धतेच्या आधारावर जिल्ह्यांची पाच स्तरात विभागणी करण्यात आली होती. यानुसार पहिल्या दोन स्तरात मोडणार्याच जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये मोठी सुट देण्यात आली. मात्र आता पहिला आणि दुसरा स्तर काढून टाकण्यात आला असून सर्व जिल्हे व महानगरपालिका क्षेत्रात तिसर्या  स्तराप्रमाणेच निर्बंध लागू राहणार आहेत.
 
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेल्या एका 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या महिलेच्या स्वॅबचे नमुने जिनोम तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल समोर आला असून या महिलेला डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाली होती, हे स्पष्ट झाले आहे. यामुळे डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे महाराष्ट्रातील गेलेला पहिला बळी, अशी या महिलेच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दोनच दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातही डेल्टा प्लसची लागण झालेल्या एका रुग्णाचा बळी गेला होता. संगमेश्वरमधील डेल्टा प्लसमुळे बळी गेलेल्या महिलेला इतरही आजार होते, असे सांगितले जात आहे. मात्र यामुळे चिंता नक्कीच वाढल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बुलेट मोटरसायकल बनवणाऱ्या रॉयल एनफील्डच्या सीईओचा राजीनामा, जाणून घ्या काय आहे कारण