suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुधीर मुनगंटीवार, बच्चू कडू यांना कोरोनाची लागण

bacchu kadu
महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुनगंटीवार यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. 'माझी कोव्हिड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया प्रोटोकॉल चे पालन करून स्वतःची चाचणी करून घ्यावी ही विनंती,' अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी ट्विटर आणि फेसबुकवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी ही विनंती देखील त्यांनी केली आहे. 
 
राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत:च्या ट्वीटर अकाऊंटवरुन त्यांनी ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या सर्वानी आपली तपासणी करण्याचे आवाहन त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केले आहे.  बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या पत्नी नयना कडू यांना देखील कोरोनाची लागण झाली. तसेच त्यांच्या कुटुंबातील एकूण बारा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पीएमसी बँक घोटाळा, आरोपींच्या मालमत्तेचा लिलाव करुन पैसे वसूल करणार