Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी TV शो आणि चित्रपटांतून हटवले जात आहे किसिंग सीन

कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी TV शो आणि चित्रपटांतून हटवले जात आहे किसिंग सीन
, सोमवार, 10 फेब्रुवारी 2020 (11:19 IST)
तैपेई- चीनमध्ये पसरलेल्या प्राणघातक कोरोना व्हायरस (coronavirus) मुळे तैवानच्या टीव्ही मालिका आणि चित्रपटांतून किसिंग सीन हटवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. हा निर्णय कोरोना व्हायरसच्या संक्रमण थांबवण्यासाठी घेतला गेला आहे. उल्लेखनीय आहे की चीनमध्ये प्राणघातक कोरोना व्हायरसमुळे 900 हून अधिक बळी गेले असून या  संक्रमणाच्या 37,000 हून अधिक प्रकरणांची पुष्टी देखील झालेली आहे.
 
युनायटेड डेलीच्या रिपोर्टप्रमाणे कोरोना व्हायरसचा धोका बघत तैवानमध्ये दाखवण्यात येणार्‍या टीव्ही मालिकेतून किसिंग सीनच्या शूटिंगवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला गेला आहे. सोबतच टीव्ही आणि सिनेमात काम करणार्‍या कलाकारांना अधिक जवळून वार्तालाप करणे टाळावे असा सल्ला देखील देण्यात येत आहे.
 
उल्लेखनीय आहे की फोरमोसा टीव्हीवर प्रसारित होणारी मालिका गोल्डल सिटी यात अभिनेत्री मिया चिऊ आणि अभिनेता जून फू यांच्यात अनेकदा किसिंग सीन चित्रित केले जातात. परंतू कोरोना व्हायरसचा धोका असल्यामुळे दोन्ही कलाकारांनी या प्रकाराचे दृश्य शूट करण्यास मनाही दिली आहे. कलाकारांप्रमाणे अशा प्रकारे सावधगिरी बाळगली जात असल्याचा त्यांना आनंद आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनोज तिवारी यांचा दिल्ली विजयाचा दावा