कोरोनाग्रस्तांच्या मोबाईल वापरावर बंदी आणण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकाराने घेतला आहे. त्यामुळे आयसोलेशन वॉर्डमध्ये आता कोरोनाच्या रुग्णांना मोबाईल वापरावर बंदी असणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे.
उत्तर प्रदेशचे महासंचालक (वैदकीय शिक्षण प्रशिक्षण) केके गुप्ता यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालय व संबधित अधिकाऱ्यांना पत्र पाठवून तशी माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यातील कोविड रुग्णालयांत रुग्णांना मोबाईल वापरता येणार नाही.
महासंचालकांच्या म्हणण्यानुसार मोबाईलमुळे कोरोनाचा संसर्ग पसरतो. त्यामुळे सद्यस्थितीत केवळ कोरोना वार्डमध्ये रुग्णालयांच्या प्रभारींकडे २ मोबाईल असतील. याद्वारे रुग्ण आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधू शकतात. या फोनमध्ये इन्फेक्शन प्रिव्हेन्शन कंट्रोल असणार आहे. तसंच एल-२ आणि एल-३ रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना फोने वापरता येणार नाही, असं आदेशात म्हटलं आहे.