Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

भाजपचे खासदार नारायण राणे यांना कोरोनाची लागण

BJP MP Narayan Rane
, गुरूवार, 1 ऑक्टोबर 2020 (15:39 IST)
ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच कोरोनाचे 86 हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) आले आहेत. बॉलिवूडपासून ते राजकारणापर्यंत कोरोनानं अनेकांच्या घरात शिरकाव केला आहे. भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. नारायण राणे यांनी स्वत: ट्वीट करून या संदर्भात माहिती दिली.'माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईन'
 
नारायण राणे यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही चाचणी करण्याचं आवाहन नारायण राणे यांनी केलं आहे. सध्या त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं असून त्यांचे डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरू आहेत.
 
राज्यात बुधवारी रात्रीपर्यंत 19,163 कोरोना रुग्णांना घरी सोडण्यात आलं तर 18,317 नवीन रुग्ण दाखल झाले. राज्यात बुधवारी रात्रीपर्यंत 10,88,322 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पण अद्याप  2,59,033 रुग्ण उपचाराधीन आहेत. तर देशात 86 हजारहून अधिक 24 तासांत लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 63 लाखावर पोहोचला आहे. भारतात कोरोनामुळे 1,181 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठा आरक्षण: EWS म्हणजे काय? मराठा समाजाने EWS सवलती का नाकारल्या?