कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, यापासून बचावासाठी सर्वसामान्य नागरिकांना मास्क आणि हॅन्ड वॉश हे रेशन दुकानातून अत्यल्प दरात उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. विधानसभेत कोरोनावर चर्चा सुरु होती. यावेळी त्यांनी मास्क आणि हॅन्ड वॉश हे रेशन दुकानातून उपलब्ध करुन देण्याची मागणी केली
“पुण्यात कोरोना रोगाचे पाच संशयित रुग्ण आढळले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनापासून बचावासाठी औषध विक्री दुकानातून तोंडाला लावण्यासाठीचे मास्क अव्वाच्या सव्वा दराने विकले जात आहेत. यामुळे सर्वसामान्य आणि झोपडपट्टी भागातील नागरिकांना हे परवडण्याजोगे नाही. त्यामुळे शासनाच्यावतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी मास्क आणि हॅन्ड वॉश हे रेशन दुकानातून अत्यल्प दरात उपलब्ध करुन द्यावेत”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.