एकीकडे शाळा नियमित सुरु झाल्या असतांना दुसरीकडे विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव शाळेतील १५ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या संपर्कातील चार विद्यार्थ्यांना कोरोनाचा लागण झाली आहे.
आता नाशिक शहराच्या चांदशी शिवारातील एका खाजगी शाळेचा विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांच्या संपर्कातील ६७ विद्यार्थ्यांची आणि ९ शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले असून या खाजगी शाळा काही दिवस बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तर मुंढेगाव शाळेसही खबरदारी घेण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.