राज्यात कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घटली आहे. मगील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या दीड हजाराच्या आसपास स्थिरावली आहे. राज्यात शुक्रवारी 1 हजार 632 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 1 हजार 744 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आतापर्यंत 64 लाख 32 लाख 138 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 40 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 39 हजार 138 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.
सध्या राज्यात 24 हजार 138 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 16 लाख 299 हजार प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 99 हजार 850 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 98 हजार 958 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 988 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.