Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५

चिंता वाढली! देशात कोरोनाबाधितांची संख्या ९३५
नवी दिल्ली , रविवार, 29 मार्च 2020 (07:43 IST)
देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून ती आता हजाराच्या जवळपास गेली आहे. गेल्या 24 तासात
देशात कोरोनाने दोन जणांचा बळी गेल्याने मृतांची संख्या 19 झाली आहे २०० हून अधिक रुग्ण आढळले असून बाधितांची संख्या ९३५ वर पोहोचली आहे. तर, दिवसभरात २ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी करोना संदर्भातील घडामोडींची माहिती दिली.

ज्या राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत तिथं केंद्र सरकारने जास्त लक्ष केंद्रीत केलं आहे. कोरोनाचा फैलाव अधिक वाढू नये म्हणून सर्व आ‌वश्यक उपाययोजनाही आखल्या जात आहेत, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्येक राज्यांत करोना रुग्णांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल बनवण्यात येणार आहे. १७ राज्यांनी या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. यामुद्द्यावर आम्ही सतत राज्यांच्या संपर्कात असून त्यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे, असं अग्रवाल म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आज मुंबई ते नागपूर पावसाची शक्यता