rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रात एका दिवसात ६६ नवीन कोरोना पॉझिटिव्ह, मुंबईत ३०० हून अधिक रुग्ण सक्रिय

corona
, गुरूवार, 29 मे 2025 (08:40 IST)
देशासोबतच महाराष्ट्रातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. महाराष्ट्रात एकाच दिवसात ६६ नवीन रुग्ण आढळले आहे. मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात कोविड संसर्गाची परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. राज्यात कोविडचे खूप कमी रुग्ण आढळत आहे आणि यापैकी बहुतेक रुग्णांमध्ये फक्त सौम्य लक्षणे आहे. सर्व संक्रमितांवर नियमितपणे उपचार केले जात आहेत. राज्यात इन्फ्लूएंझासारखी लक्षणे आणि तीव्र श्वसन संसर्गाच्या संसर्गाचे सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षणांतर्गत, लक्षणे दर्शविणाऱ्या रुग्णांवर कोविड चाचण्या केल्या जात आहेत. जानेवारी २०२५ पासून एकूण ८,२८२ कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहे, त्यापैकी ४३५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहे. बुधवारपर्यंत, १०६ रुग्ण बरे झाले आहे, तर ३२५ रुग्ण अजूनही सक्रिय आहे. अशी माहिती समोर आली आहे. 
 
२७ मे रोजी राज्यात एकूण ६६ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. ज्यामध्ये मुंबईत ३१, पुण्यात १८, ठाण्यात ७, नवी मुंबईत ४, पनवेलमध्ये ३, सांगलीत १ आणि नागपूरमध्ये २ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. आणि कोविडमुळे ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशभरात कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू
आतापर्यंत देशभरात कोरोनामुळे सुमारे ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: महाराष्ट्रात पाऊस व वादळात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू