राज्याच्या उपराजधानीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील ब्लास्ट झाला असून २४ तासात ३३७० बाधित रुग्ण आढळले असून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पूर्व विदर्भात ४१३४ बाधित रुग्ण आढळले आहे. तर २६ जणांचा मृत्यू झाला आहे. एवढी कठीण परिस्थिती निर्माण झाली असली तरीही नागरिक मात्र बेजाबदारपणे वागत आहेत. तर महापालिकेत सत्तेत असलेला भाजप कोरोनाच्या काळातही राजकारण करत आहे. अशी चर्चा नागपूर शहरात सुरु आहे.
२४ तासात ३३७० बाधित रुग्ण आढळले असून एकट्या नागपूरमध्ये २६६८ ग्रामीणमध्ये ६९९ तर इतर जिल्ह्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. बाधितांची संख्या १७८७५६ वर पोहोचली आहे. २४ तासात १६ मृत्यू झाले असून ८ मृत्यू शहरात ५ ग्रामीण भागात ३ इतर जिल्ह्यातील आहेत. पूर्व विदर्भात आज २६ मृत्यू झाले त्यात नागपूर १६, चंद्रपुर, वर्धा ६, गडचिरोली २ चा समावेश आहे.
नागपुरात सध्या २१११८ ऍक्टिव्ह रुग्ण असून १७१७० शहरात तर ग्रामीण भागात ३९४८ रुग्ण आहेत. आज १५००० चाचण्या झाल्या असून शहरात १०२३७ ग्रामीण भागात ४७६३ चाचण्या झाल्या.