Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वृत्तपत्रातून कोरोना पसरत नाही; ‘डब्ल्यूएचओ'चा निष्कर्ष

वृत्तपत्रातून कोरोना पसरत नाही; ‘डब्ल्यूएचओ'चा निष्कर्ष
न्यूयॉर्क , शनिवार, 28 मार्च 2020 (12:06 IST)
जगभरातील ज्येष्ठ डॉक्टर आणि वैज्ञानिकांच्या म्हणणनुसार, वृत्तपत्र, नियतकालिक, पत्र अथवा पाकीट आदी छापील माध्यमाद्वारे कोव्हिड-19 विषाणूचा प्रसार झाल्यापी अद्याप एकही घटना घडलेली नाही.
 
अशा प्रकारची जागतिक साथ यापूर्वी कधीही न पाहिल्याने आपण ज्या वस्तूला स्पर्श करू त्याबद्दल नकळतपणे शंका निर्माण होणे साहजिक आहे. परंतु, वस्तुस्थिती काय, तर छापील वस्तूद्वारे विषाणूच्या प्रसाराची कोणतीही घटना घडलेली नाही. जोवर हे ‘प्रिंट प्रॉडक्ट' ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही, तोवर त्याला असुरक्षित हातांचा स्पर्श होणार नाही याची खातरजमा करण्यासाठी वृत्तपत्रांचे प्रकाशकही अनके पावले उचलत आहेत.
 
सर्वांत पहिला प्रश्न म्हणजे, ज्या भागात कोव्हिड-19 चा प्रसार झालेला आहे, तेथून आलेले पॅकेज स्वीकारणे सुरक्षित आहे का? ‘डब्ल्यूएचओ'च्या म्हणणनुसार, कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीकडून एखाद्या व्यवसायिक उत्पादन प्रदूषित होण्याची शक्यता क्षीण आहे. अनेक प्रकारच्या   वातावरणातून पार झालेल्या, रवाना केल्या गेलेल्या एखाद्या पॅकेजद्वारे विषाणूच्या प्रादुर्भावाचा धोका नसल्यातच जमा आहे.
 
हार्टफोर्ड हेल्थ केअरने अजून स्पष्टपणे सांगितले आहे, की घरापर्यंत आलेल्या वस्तूबाबत चिंता करण्याचे कारण नाही. काही अंतर पार करून आलेल्या वस्तूंवर विषाणू टिकणची शक्यता नाही.
अलीकडे इंटरनॅशनल न्यूज मीडिया असोसिएशन (आएनएए) कडूनही याविषयीची माहिती मागवण्यात आली. या विषावरील शंका दूर करण्यासाठी संशोधन धुंडाळले गेले, जागतिक आरोग्य  संघटनेसह काही प्रमुख संस्थांच्या सूचना तपासल्या गेल्या. सध्याच्या संकटकाळात वृत्तपत्रीय कागदाला स्पर्श करणे सुरक्षित आहे, असा निष्कर्ष निघत राहीपर्यंत हे संशोधन सुरू ठेवण्यात येईल, असे आएनएएने सांगितले आहे.
न्यूज प्रिंट संबंधित शंका दूर करणसाठीफ वृत्तपत्र प्रकाशित करणारे लोक विविध पावले उचलत आहेत.
* होम डिलिव्हरी : होम डिलिव्हरी स्टाफला हँड सॅनिटाझर आणि वाईप्स पुरविले जात आहेत. वृत्तपत्र इमारतीच्या बाहेर ठेवण्यात येत आहे.
* सिंगल कॉपी डिस्ट्रिब्युटर : न्यूज स्टँड, डिस्ट्रिब्युटर आणि रस्त्यावर   वृत्तपत्र विकणार्यांरना हातमोजे, मास्क आणि सॅनिटाझर दिले जात आहेत.
* छपाई तंत्राची माहिती : वृत्तपत्राची निर्मिती चलित असते आणि त्यात  जोखीम  कमी आहे, अशी प्रिंट आवृत्तीच्या माध्यमातून माहिती दिली जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खोट्या बातम्या देणे थांबवा, संतापली धोनीची पत्नी