Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एअर इंडियाच्या विमानात कोरोनाचा स्फोट, 182 पैकी 100 प्रवाशांना लागण

एअर इंडियाच्या विमानात कोरोनाचा स्फोट, 182 पैकी 100 प्रवाशांना लागण
, गुरूवार, 6 जानेवारी 2022 (16:00 IST)
देशात कोरोना संसर्गाचा वेग चिंताजनक वेगाने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत 56 टक्के वेगाने 90 हजार 928 लोकांना याची लागण झाली असून त्यामुळे 325 जणांचा मृत्यू झाला आहे. याआधी बुधवारी 58 हजार रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या 24 तासांत मुंबईत 15 हजारांहून अधिक लोक या जीवघेण्या विषाणूच्या विळख्यात आले आहेत ओमिक्रॉन प्रकाराने संक्रमित रुग्णांची संख्या देखील 2000 च्या पुढे गेली आहे.
इटलीहून अमृतसरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात 182 पैकी 100 प्रवाशांना संसर्ग झाल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे आयसोलेट केले जात आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील एकूण ओमिक्रॉन संक्रमितांची संख्या 2,630 झाली आहे. 797 प्रकरणांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याचवेळी 465 रुग्णांसह दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे. ओमिक्रॉनच्या 2,630 रुग्णांपैकी 995 रुग्ण बरे झाले आहेत. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Viral Video: सेमिनारमध्ये थुंकून जावेद हबीबने महिलेचे केस कापले, म्हणाले- 'पाण्याची कमतरता आहे म्हणून...' पाहा व्हिडिओ