Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय कोरोना व्हायरस चीनचं प्राणघातक जैविक शस्त्र आहे, 40 वर्षांपूर्वी प्रकाशित पुस्तकात लपलेलं गूढ...

काय कोरोना व्हायरस चीनचं प्राणघातक जैविक शस्त्र आहे, 40 वर्षांपूर्वी प्रकाशित पुस्तकात लपलेलं गूढ...
webdunia

स्मृति आदित्य

, बुधवार, 4 मार्च 2020 (18:04 IST)
डीन आर कुंट्जच्या वाचकांना माहीत आहे की कशा प्रकारे थ्रिल आणि सस्पेंसचं कमालीचं मिश्रण त्यांच्या पुस्तकांमध्ये आहे परंतू सध्या पुस्तक द आइज ऑफ डार्कनेस (the eyes of darkness) ची अचानक मागणी वाढली आहे आणि याचे कारण आहे- कोरोना व्हायरस.
 
1981 च्या जवळपास लिहिण्यात आलेल्या या पुस्तकात एका संक्रमणाचं उल्लेख आहे ज्याला वुहान 400 असं नाव देण्यात आलं आहे. अर्थात सुमारे 40 वर्षांपूर्वीच त्या व्हायरसबद्दल पुस्तकात उल्लेख सापडतो. एका अमेरिकनची ही कृती सुरू होते एका आईपासून जी आपल्या मुलाला ट्रॅकिंग ग्रुपसह पाठवते आणि पूर्ण ग्रुप मारला जातो.
 
नंतर अनेक संकेत सापडल्यावर आई आपला मुलगा जिवंत आहे की नाही हे शोधायला सुरू करते आणि तिला अमेरिकी आणि चिनी देशांच्या त्या जैविक शस्त्रांबद्दल खूप काही माहिती सापडते. या पूर्ण पुस्तकात लेखनासंबंधी कमाल आपल्या जागी आहे परंतू सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे यात कोरोना व्हायरससंबंधी उल्लेख आहे ज्यामुळे जगातील प्रत्येक माणूस काळजीत आहे. यात चीनच्या वुहान येथे त्याच्या उद्गम असल्याचा उल्लेख आहे जेथून हा व्हायरस पसरला आहे. 
 
पुस्तकात ली चेन नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख आहे जी चीनच्या एक महत्त्वाकांक्षी जैविक शस्त्राच्या प्रकल्पाची माहिती चोरून अमेरिकेला पुरवते. चीन याद्वारे जगातील कोणता ही भाग, कोणातही कोपरा मानवरहित करण्याची शक्ती प्राप्त करू इच्छित असतो. परंतू अमेरिकी एजेंसींना कठिण परिस्थितीत या धोकादायक जैविक शस्त्राचं तोड शोधण्यात यश मिळतं.
 
वुहान 400 कोड ठेवण्याचा तर्क पुस्तकात देण्यात आलं आहे की याला वुहान प्रांताच्या बाह्य भागात तयार केलं गेलं आणि कोडमध्ये 400 यासाठी जोडण्यात आले कारण हे लॅबमध्ये तयार करण्यात आलेल्या 400 व्या शस्त्रासारखं होतं. एक आश्चर्याची बाब म्हणजे या पुस्तकात दुसर्‍या व्हायरसची यासोबत तुलना केली गेली आहे. आणि याची सर्वात अधिक जवळीक तुलना करण्यात आलेल्या धोकादायक इबोला व्हायरसचे लक्षण आढळणारे आहेत. अर्थात जगासमोर सामोरा आलेल्या या दोन्ही धोक्यांचं या पुस्तकात उल्लेख आहे.
 
पुस्तकाच्या तर्काप्रमाणे हा व्हायरस मानव शरीराच्या बाहेर एक मिनिट देखील जिवंत राहू शकत नाही आणि या प्रकाराचा संक्रामक व्हायरस तयार केल्याने आक्रमण करणाऱ्या देशांसाठी ताबा घेणे सोपं जातं कारण व्हायरसचं संक्रमण मानवांसोबत संपतं. या थ्रिलर कादंबरीतील अनेक तथ्य धक्कादायक असले तरी या पुस्तकाद्वारे या धोकादायक समस्यांचं समाधान शोधलं जात आहे. 
 
जसे वैज्ञानिक याकडे देखील फार लक्ष देत आहेत की यात व्हायरसचे सांगण्यात आलेल्या लक्षणांपैकी यावर उपचार करण्यासाठी आधार तयार करता येऊ शकतं. कुंट्जच्या या पुस्तकात सांगण्यात आलं आहे की संक्रमित व्यक्तीच्या मृत्यूनंतर जसंच मृतदेहाचं तापमान 86 डिग्री फॅरनहाईट किंवा याहून कमी होतं, सर्व व्हायरस लगेच नष्ट होतात.
 
हे पुस्तक वाचणार्‍यांमध्ये आता केवळ हौशी पुस्तक प्रेमीच नाही तर शोध, औषधं निर्माण करणार्‍या कंपनी आणि मेडिकलशी निगडित सेलिब्रिटीही सामील झाले आहेत. अखेर जगाला एक अश्या नवीन धोक्यापासून वाचवायचे आहे कारण हा आजार आता महामारीचं रुप धारण करत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सावधान : पेटीएम अ‍ॅप अपडेट करायच्या नावाखाली बँक खात्यातून १ लाख रुपये लांबविल्याचा प्रकार पुणे येथे उघड