Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाचे दि. 13 रोजी १४९५ नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण २५ हजार ९२२

कोरोनाचे दि. 13 रोजी १४९५ नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण २५ हजार ९२२
राज्यात कोरोनाचे ३०९४ रुग्ण बरे होऊन घरी
५५४७ रुग्ण बरे होऊन घरी – आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २५ हजार ९२२ झाली आहे. आज १४९५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ४२२ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५५४७ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ३० हजार ८५७ नमुन्यांपैकी २ लाख ०३ हजार ४३९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर २५ हजार ९२२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९८ हजार २१३ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १४ हजार ६२७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ५४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ९७५ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील ४०, पुण्यात ६, जळगावमध्ये २, सोलापूर शहरात २,  औरंगाबाद शहरात २, वसई विरारमध्ये १ तर १ मृत्यू रत्नागिरीमध्ये झाला आहे. झालेल्या मृत्यूंपैकी ३३ पुरुष तर २१ महिला आहेत.

आज झालेल्या ५४ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २९ रुग्ण आहेत तर २१ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहेत. या ५४ रुग्णांपैकी ३६ जणांमध्ये (६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनावर ९४ वर्षाच्या आजींची यशस्वी मात