Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोना

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोना
, सोमवार, 10 ऑगस्ट 2020 (16:23 IST)
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याबाबत स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे. तसेच मागील आठवड्यात त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना टेस्ट आणि आयसोलेटेड होण्यास त्यांनी सांगितले आहे.
 
प्रवण मुखर्जी यांनी ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, ‘एका दुसऱ्या कारणासाठी आपण रुग्णालयात गेलो होतो. यावेळी मला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. गेल्या आठवड्यात माझ्या संपर्कात जे कोणी लोक आले आहेत, त्यांनी सर्वांनी कोरोना टेस्ट करा आणि आयसोलेटेड व्हा’, अशी विनंती त्यांनी केली आहे.
 
प्रवण मुखर्जी यांच वय ८४ वर्षे आहे. वाढत्या वयामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी हे २०१२ ते २०१७ पर्यंत देशाचे राष्ट्रपती राहिले आहेत. २०१९ सोली केंद्र सरकारने प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यंदा गणेशोत्सवासाठी मनसेचा 'आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी' उपक्रम