Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

राज्यात सर्वात मोठी कोरोना रुग्णसंख्येत घट

The largest reduction in the number of corona patients in the state
, मंगळवार, 8 मार्च 2022 (07:53 IST)
मागील काही दिवसांपासून राज्यात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस आधिकाधिक घट होताना दिसत आहे. सोमवारी देखील पहिल्यांदाच राज्यात सर्वात मोठी रुग्णसंख्येत घट झाली आहे. 18 एप्रिल 2020 पासूनची राज्यातील ही सर्वाधिक घट असलेली रुग्णसंख्या आहे.  राज्यात सोमवारी  225 नव्या कोरोनाबाधित आढळले असून एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. यापूर्वी 2 मार्चला राज्यात एकही मृत्यूची नोंद झालेली नव्हती. त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्यांदा राज्यात एकही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या 78 लाख 69 हजार 38वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत 1 लाख 43 हजार 740 जणांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यात 3 हजार 472 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत.
 
तर 461 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण 77 लाख 17 हजार 823 कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.08% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 83 लाख 14 हजार 109 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78 लाख 69 हजार 38 (10.05 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 28 हजार 975 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 589 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गारवा! नाशिकमध्ये पावसाच्या हलक्या सरी!