अलगीकरण (आयसोलेशन) कक्षात उपचार सुरू असलेल्या करोनाबाधित रुग्णाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. करोनाबाधित रुग्णाने शनिवारी पहाटे गळ्याला ब्लेड मारून स्वतःला गंभीर जखमी करून घेतले. त्यानंतर उपचारादरम्यान त्या करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला.
अकोला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोरोना संसर्गित रुग्ण म्हणून दि.७ एप्रिल रोजी दाखल झालेला रुग्ण पहाटे ५ वाजताच्या सुमारास गळा कापलेल्या अवस्थेत बाथरूममध्ये रक्तबंबाळ असल्याचे दिसून आले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्याचेवर उपचार सुरू करण्यात आले. शस्त्रक्रिया सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे यांनी सांगितले. मयत रुग्णाचे नाव मोहम्मद जहरुल इस्लाम (३०) असे असून तो मूळचा सालपडा जि. नागाव,आसाम येथील रहिवासी आहे. अहवालात हा रुग्ण करोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले होते.