Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Corona Virus India Update : कोरोना संसर्ग पुन्हा वाढला, 24 तासांमध्ये 44,643 नवीन प्रकरणे, 464 मृत्यू

Corona Virus India Update : कोरोना संसर्ग पुन्हा वाढला, 24 तासांमध्ये 44,643 नवीन प्रकरणे, 464 मृत्यू
, शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (10:35 IST)
देशात कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पुन्हा एकदा चिंता वाढवत आहेत. गेल्या 24 तासांमध्ये, देशात कोरोनाव्हायरसची 44,643 नवीन प्रकरणे नोंदली गेली, 41,096 लोक बरे झाले आणि 464 लोकांचा या साथीमुळे मृत्यू झाला.
 
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, देशात आतापर्यंत एकूण 3,18,56,754 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 3,10,15,844 लोक निरोगी झाले आहेत. 426754 लोकांचा मृत्यू झाला आणि 4,14,159 लोकांवर उपचार सुरू आहेत. देशात सक्रिय प्रकरणांचा दर 1.30 टक्क्यांवर आला आहे, बरे होण्याचा  दर वाढून 97.36 टक्के झाला आहे आणि मृत्यू दर 1.34 टक्के आहे.
 
ही 3 राज्य चिंता वाढवत आहेत: केरळमध्ये सक्रिय प्रकरणांमध्ये 1,874 ची आणखी वाढ झाल्यानंतर आता त्यांची एकूण संख्या 1,77,923 झाली आहे. दरम्यान, आणखी 20,046 लोकांनी कोरोनावर मात केल्यानंतर, संसर्गमुक्त लोकांची संख्या 32,97,834 झाली आहे,तर आणखी 117 रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांचा आकडा 17,328 वर पोहोचला आहे.
 
महाराष्ट्रात, या काळात सक्रिय प्रकरणांची संख्या 1,229 ने कमी झाली, जी आता 74,995 वर आली आहे. याच काळात,आणखी 6,718 लोकं बरे झाल्यामुळे,संक्रमित लोकांची संख्या 61,24,278 पर्यंत वाढली आहे, तर 120 रुग्णांच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या 1,33,530 झाली आहे.
 
कर्नाटकमध्ये कोरोना विषाणूची सक्रिय प्रकरणे 84 ने वाढून 24,414 झाली आहेत. तर,आणखी 25 रुग्णांच्या मृत्यूनंतर, मृतांचा आकडा 36,705 वर गेला आहे, तर राज्यात आतापर्यंत 28,52,368 रुग्ण बरे झाले आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजप आणि मनसे जाहीर युती करणार का?