चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे दिल्ली, मुंबई, कोलकाता या राज्यांच्या विमानतळांवर देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिवाय परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी देखील विमानतळांवर करण्यात येत आहे.
चीनच्या वूआंग शहरात लागण झालेल्या नोवेल कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू तर ३०० जणांना या विषाणूचा संसर्ग आला आहे. परदेशातून आलेला हा व्हायरस रूग्णांमार्फत भारतात पसरण्याची भिती वर्तवली जात आहे.
चीनसोबतच आता थायलँड, सिंगापूर, मलेशिया या देशांमध्ये देखील या विषाणूचा धोका पसरत आहे. या पार्श्वभूमीवर परदेशी प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय एसओएस’ या कंपनीने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.