Coronavirus: स्पेनमध्ये मृतदेह सडून गेले, वृद्धांना बेवारस सोडलं

मंगळवार, 24 मार्च 2020 (12:18 IST)
कोरोना व्हायरसमुळे स्पेन तिसरा असा देश आहे ज्यात सर्वात अधिक धोका आहे. येथे आतापर्यंत 2000 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 35 हजार लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. सर्वात मोठी चिंताची बाब म्हणजे मागील चौवीस तासात येथे साडे चारशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 
 
येथे क्रबिस्तानात जागी कमी असल्यामुळे अनेकांचे मृतदेह घरात पडलेले आहेत आणि ते हटवण्यासाठी आता स्पेन सरकार सेनेची मदत घेत आहे. एवढेच नाही तर काही व्यस्कर लोकांना लावारिस सोडण्यात आले आहेत. 
 
चीन आणि इटलीनंतर स्पने सर्वाधिक संक्रमित देश आहे. 14 मार्च पासून पूर्ण स्पेनमध्ये लॉकडाउन केले गेले आहे. तरीही प्राण गमवणार्‍यांची संख्या कमी होत नाहीये. 
 
स्पेन सरकारने आपली तपासणी प्रक्रिया अधिक सक्रिय केली असून अधिकाधिक प्रकरण समोर येत आहे. अशात सेनेला केअर होम्सला व्हायरसमुक्त करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. स्पेनच्या सेनेला घरात पडलेले मृतदेह शोधून काढण्यास सांगितले गेले आहे कारण संक्रमणमुळे कुंटुंबातील इतर सदस्य मृतदेहाला हात लावायला तयार नाही.
 
आता अशा घरातून पोहचून सैनिक शव उचलत आहे. तसेच सेना वृद्धाश्रमांची तपासणी करत आहे जेथे व्यस्कर लोकं राहत होते. तरी स्पेन सरकारकडून याबद्दल अधिकृत मा‍िहती‍ मिळालेली नाही. पण सेनेला असे अनेक वृद्ध सापडले ज्यांना जिवंत अवस्थेत बेवारस सोडण्यात आले होते. 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख खासगी डॉक्टरांनी ओपीडी बंद ठेऊ नये, आरोग्य विभागाचे आवाहन