Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

Coronavirus update 14 एप्रिलनंतर सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद

Coronavirus update The lowest number of patients since April 14
, शुक्रवार, 28 मे 2021 (10:51 IST)
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात 27 मे 2021 म्हणजे गुरुवारी 1 लाख 86 हजार 364 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, एक महिन्यातल्या सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. 14 एप्रिलनंतर समोर आलेला करोना संक्रमितांचा हा सर्वात कमी आकडा आहे. यापूर्वी 24 मे रोजी करोना संक्रमितांचा आकडा दोन लाखांच्या खाली आला होता. 
 
महाराष्ट्रात गुरुवारी (27 मे) 21,273 नवे कोरोना रुग्ण आढळले तर 425 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 34,370 रुग्ण बरे होऊन घरी परतले. महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या 3 लाख 1 हजार 41 इतकी आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 93.02% वर आला आहे. राज्यात आतापर्यंत 56 लाख 72 हजार 180 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 52 लाख 76 हजार 203 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 92 हजार 225 जणांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
 
देशात गेल्या 24 तासांत करोनामुळे 3660 जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात 2 लाख 59 हजार 459 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आलीय. गुरुवारी देशात सर्वाधिक रुग्णसंख्या तामिळनाडू (33 हजार 361), केरळ (24 हजार 166), कर्नाटक (24 हजार 214), महाराष्ट्र (21 हजार 273) या राज्यांतून समोर आलीय.
 
याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 75 लाख 55 हजार 457 वर पोहचलीय. देशात आत्तापर्यंत 2 कोटी 48 लाख 93 हजार 410 रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरलेत. तर सध्या 23 लाख 43 हजार 152 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशातील मृतांची एकूण संख्या 3 लाख 18 हजार 895 वर पोहचलीय.
 
ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, 27 मे 2021 पर्यंत देशात एकूण 33 कोटी 90 लाख 39 हजार 861 नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय. यातील 20 लाख 70 हजार 508 नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात करण्यात आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय : देशातील निर्बंध ३० जूनपर्यंत