भारतात (India) कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून देशात कोरोना बाधितांच्या संख्येने आता 10 लाखांचा टप्पा पार केला आहे. आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry of India) दिलेल्या माहितीनुसार भारतात मागील 24 तासांत 34,956 कोरोनाचे (COVID-19) रुग्ण आढळले असून 687 रुग्ण दगावले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. यामुळे देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 10,03,832 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 25,602 वर पोहोचली आहे.