Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोविड संशयित मृत्यू - पोलिस यंत्रणेला चौकशी न करण्याची मुभा

कोविड संशयित मृत्यू - पोलिस यंत्रणेला चौकशी न करण्याची मुभा
, शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (16:51 IST)

कोरोना पार्श्वभूमीवर रुग्णालयात दाखल  झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीची पोलीस यंत्रणेमार्फत होणारी चौकशी (Inquest) न  करण्याची मुभा पोलिसांना देण्यात आली आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा मृत्यू झाल्यानंतर Inquest च्या वेळी डॉक्टर, वैद्यकीय यंत्रणा, नर्सेस, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे  शासनाने हा निर्णय घेतला आहे.साथरोग नियंत्रण कायदा १८९७ मधील भाग 2 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदी अन्वये राज्यामध्ये निर्बंध असेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत.

गृहविभागाने नुकतेच याबाबत एक परिपत्रक  काढले आहे . शासनाच्या या www.maharashtra.gov.in  संकेत स्थळावर हे परिपत्रक उपलब्ध आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुमच्या कडे आधार कार्ड आहे मग गुंतवणूक करून कमवा 4 लाख रु.