Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोवॅक्सीन च्या तुलनेत कोव्हीशील्ड ने जास्त अँटीबॉडीज बनतात.

कोवॅक्सीन च्या तुलनेत कोव्हीशील्ड ने जास्त अँटीबॉडीज  बनतात.
, सोमवार, 7 जून 2021 (21:06 IST)
नवी दिल्ली:कोवॅक्सीन च्या तुलनेत कोव्हीशील्ड ने जास्त अँटीबॉडीज बनवतात.जरी दोन्ही लस रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास अधिक चांगल्या  आहेत. सावधगिरी म्हणून दोन्ही लसींचे डोस घेतलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांवर केलेल्या अभ्यासानुसार ही बाब समोर आली आहे.
 
हा अभ्यास अद्याप प्रकाशित केला गेलेला नाही आणि तो प्रकाशित होण्यापूर्वी मेडआरएक्सिव वर पोस्ट केला गेला आहे. या अभ्यासात 13 राज्यातील 22 शहरांमधील 515 आरोग्य कर्मचारी समाविष्ट आहे. या मध्ये 
305 पुरुष आणि 210 महिला होत्या.
ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची कोव्हीशील्ड सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया ही लस तयार करत आहे.
 
हैदराबादची कंपनी भारत बायोटेक इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांच्या सहकार्याने कोवॅक्सीन ची निर्मिती करीत आहे.
अभ्यासातील सहभागींच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये अँटीबॉडीज आणि त्याच्या स्तराची तपासणी केली गेली.
 
कोलकाता येथील जीडी हॉस्पिटल आणि डायबेटिक इन्स्टिट्यूटच्या अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि सल्लागार एंडोक्रिनोलॉजिस्ट (डायबेटोलॉजिस्ट) अवधेश कुमार सिंह यांनी ट्विट केले की, दोन्ही डोस घेतल्यानंतर दोन्ही लसींनी प्रतिकारशक्ती बळकट करण्याचे काम केले.
तथापि, कोविक्सिनच्या तुलनेत कोव्हीशील्डमध्ये सिरो पॉझिटिव्हिटी दर  आणि अँटीबॉडी पातळी जास्त होती. कोव्हीशील्ड घेणार्‍या बहुतेक लोकांमध्ये कोवॅक्सीन लस घेण्यापेक्षा सिरो -पॉझिटिव्हिटी दर जास्त होता. .
 
अभ्यासाचे लेखक म्हणाले की 515 आरोग्य सेवा कर्मचार्‍यांपैकी 95 टक्के लोकांमध्ये दोन्ही लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर त्यांच्यात सिरो -पॉझिटिव्हिटी दिसली. यापैकी 425 लोकांनी कोव्हीशील्ड घेतले होते आणि 90 जणांनी कोवॅक्सीन  डोस घेतले होते.आणि सिरो पॉझिटिव्हिटीचे प्रमाण अनुक्रमे 98.1 टक्के,आणि 80 टक्के होते.सिरो पॉझिटिव्हिटी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडीजशी आहे.
 
अहमदाबादमधील विजयरत्न डायबेटिक सेंटर, कोलकाता मधील जीडी हॉस्पिटल आणि डायबेटिक इन्स्टिट्यूट, धनबादमधील मधुमेह आणि हृदय संशोधन केंद्र आणि जयपूरमधील महात्मा गांधी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या संशोधकांनी हा अभ्यास केला.
अभ्यासात त्यांनी कोरोनाने संसर्ग झालेल्या आणि ज्यांना संसर्ग झाले नहव्ते अशा लोकांमध्ये दोन्ही डोस घेतल्यावर त्याच्या निकषांची तुलना केली.
 
असे आढळले आहे की दोन्ही लसांच्या पहिल्या डोसच्या सहा आठवड्यांपूर्वी कोविड-19 पासून बरे झाले आणि त्यानंतर त्यांनी दोन्ही लस घेतल्या. त्यांच्या मध्ये सिरो पॉझिटिव्ह दर 100 टक्के होती आणि इतरांच्या तुलनेत अँटीबॉडीजची पातळी देखील जास्त होती.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे