Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यातील या महापालिकेत ‘कोविशिल्ड’ची पुन्हा टंचाई, शनिवारी फक्त ‘कोव्हॅक्सिन’ची लस मिळणार

पुण्यातील  या महापालिकेत ‘कोविशिल्ड’ची पुन्हा टंचाई, शनिवारी फक्त ‘कोव्हॅक्सिन’ची लस मिळणार
, शनिवार, 24 जुलै 2021 (08:17 IST)
कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लशीची पुन्हा टंचाई निर्माण झाली आहे. लशीचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना फक्त ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
 
18 ते 44 वयोगटातील नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’ चा दुसरा डोस ‘या’ केंद्रांवर मिळणार !
स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल, शिवतेजनगर आणि अश्विनी मेडिकल फाऊंडेशन, मोरया हॉस्पिटल चिंचवड या 2 केंद्रांवर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना 100 च्या क्षमतेने ‘कोव्हॅक्सिन’ची लस मिळणार आहे. कोविन अॅपवर नोंदणी करुन स्लॉट बुक केलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल. उद्या सकाळी 8 नंतर कोविन ॲपवर नोंदणीसाठी स्लॉट बुकींग करण्यासाठी ओपन करण्यात येतील.

45 वर्षापुढील नागरिकांना ‘या’ केंद्रांवर मिळणार लस
45 वर्षापुढील नागरिकांना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ॲप या पद्धतीने नवीन भोसरी रुग्णालय आणि पिंपळेनिलख येथील महापालिकेची इंगोले शाळा येथे 100 च्या क्षमतेने ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक जिल्ह्यात मागील २४ तासात : जिल्ह्यात १०८ कोरोना मुक्त : ४२० कोरोनाचे संशयित : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५५ %