Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 24 March 2025
webdunia

राज्यात १८ हजार १०५ नवीन कोरोना रुग्णांचे निदान

राज्यात १८ हजार १०५ नवीन कोरोना रुग्णांचे निदान
, शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (08:55 IST)
राज्यात गुरुवारी १३ हजार ९८८ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ६ लाख १२ हजार ४८४ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५८ टक्के आहे. गुरुवारी १८ हजार १०५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख ०५ हजार ४२८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. 
 
पाठविण्यात आलेल्या ४३ लाख ७२ हजार ६९७ नमुन्यांपैकी ८ लाख ४३ हजार ८४४ नमुने पॉझिटिव्ह (१९.२९ टक्के) आले आहेत. राज्यात १४ लाख २७ हजार ३१६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ७४५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात गुरुवारी  ३९१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३ टक्के एवढा आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दुग्धविकास, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार कोरोना पॉझिटिव्ह