Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Expert Advice : प्रत्येक सर्दी -पडसं कोविड - 19 नाही, घाबरू नका, रोगाला ओळखा.....

Expert Advice : प्रत्येक सर्दी -पडसं कोविड - 19 नाही, घाबरू नका, रोगाला ओळखा.....
, शनिवार, 11 जुलै 2020 (13:55 IST)
नेहा रेड्डी 
कोरोना व्हायरसला घेउन सध्या लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहेत. अश्या परिस्थितीत लोकं मानसिक समस्येला देखील बळी पडत आहेत. या संदर्भात आम्ही डॉ. अलोक वर्मा यांच्याशी संवाद साधला आणि जाणून घेतले कोविड -19 आणि सविस्तर इतर आजारांबद्दल. चला जाणून घेऊ या...
डॉ. आलोक वर्मा (MBBS MD)
गेल्या 6 महिन्यापासून संपूर्ण जग कोरोनाने मांडलेल्या थैमानाशी झुंजून राहिले आहेत. जसे जसे वेळ सरत आहे तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ या आजार आणि त्याचा निदानाचे मार्गदर्शन करीत आहेत.
 
कोरोना सध्या आपल्या देशासाठी एका आहवानात्मक झाले आहेत, तिथेच हवामानाच्या बदलीमुळे होणारे आजार देखील आपले परिणाम दाखवतील.अश्या कठीण परिस्थितीत प्रत्येक नागरिकाला दक्षता घेऊन संयमाने समजावं लागणार की हे लक्षणे कोणत्या आजाराचे आहे ?
  covid-19  फ्लू  सर्दी पडसं
incubation period     2 ते 14 दिवस  1 ते 4 दिवस     1 ते 3 दिवस
लक्षण सुरु होतात  हळू-हळू एकाएकी हळू-हळू
खोकला साधारणपणे साधारणपणे मध्यमपासून सरासरी
धाप लागणं साधारणपणे कधी-कधी हलकं
ताप साधारणपणे साधारणपणे दुर्मिळ
अशक्तपणा साधारणपणे साधारणपणे कधी-कधी
नाक वाहण कधी-कधी  कधी-कधी साधारणपणे
नाक बंद होणे कधी-कधी  कधी-कधी साधारणपणे
अतिसार कधी-कधी  कधी-कधी दुर्लभ
अंगदुखी कधी-कधी  साधारणपणे थोड़
घश्यात खवखव कधी-कधी  कधी-कधी साधारणपणे
डोकं दुखी  कधी-कधी  साधारणपणे दुर्लभ
भूक न लागण कधी-कधी  साधारणपणे कधी-कधी  
श्वसनाशी निगडित त्रास कधी-कधी         साधारणपणे कधी-कधी कधी-कधी  
थंडी वाजणं कधी-कधी   अगदी सामान्य असाधारणपणे
चव किंवा वास एकाएकी न येणं साधारणपणे कधी-कधी कधी-कधी  
रिकवरी 2 आठवडे किंवा 3 ते 6 आठवडे  गंभीर केसमध्ये  3 ते 7 दिवस 10 दिवस गंभीर केस असल्यास 7 ते 10 दिवस
       
आपल्या देशात श्रावणसरी दरवर्षी आपल्या बरोबर कोणते न कोणते आजार घेऊन येते, जसं मलेरिया, डेंगू, चिकनगुनिया, फ्लू आणि सर्दी, पडसं आणि ऍलर्जी इत्यादी. अश्या वेळी सर्दी पडसं, फ्लू किंवा कोविड-19 या मधून सामान्य माणसाला काय झालं आहे, हे शोधणं जरा अवघड असतं, पण घाबरून न जाता समजूतदारीने वागण्याची गरज आहे.
 
साधारणपणे दर वर्षी हवामानातील बदलावमुळेच काही लोकांना सर्दी-पडसं होत, जे काहीवेळा वाढल्यामुळे दम्याचं रूप घेतं. त्याच बरोबर फ्लू किंवा इन्फ्लुएंझा देखील एका प्रकारच्या व्हायरस ने पसरणारा आजार आहे, जे या हंगामात एकमेकांना पसरतो. संयम ठेवून हे समजणे गरजेचे आहे की कोणाला कोणते लक्षणं आहेत?
खाली तालिकेमध्ये सांगितलेल्या लक्षणांच्या आधारे आपण हे निर्णय घेऊ शकतो आणि गरज असल्यास शासनाने अधिकृत केलेल्या फ्लू चिकित्सालयात आपली तपासणी आणि औषधोपचार करवू शकता.
इथे हे जाणून घेणे गरजेचे आहे की कोविड -19 किंवा कोरोनाचा संसर्ग कोणा संसर्गी माणसाच्या संपर्कात आल्यावरच होऊ शकतो.
काही लोकं वेळ आणि हवामानाच्या बदलण्यामुळे सर्दी-पडसं आणि ऍलर्जी किंवा दम्याचे बळी ठरतात. अश्या लोकांना कोविड -19 च्या संसर्ग असणाऱ्या पासून दूर राहावं.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार कोविड 19 मध्ये रुग्ण जवळ जवळ 15 %टक्के गंभीर अवस्थेत आणि 5 % टक्के खूपच अत्यावस्थेत जाऊ शकतात.
कोविड 19 च्या रुग्णांचे फ्लूच्या रुग्णाच्या तुलनेत अत्यंत गंभीर आणि अंत्यावस्थेत पोहोचण्याचा धोका जास्त असतो. कोविड- 19 ची मृत्यूदर देखील फ्लूच्या तुलनेत जास्त आहे. 
 
या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन घराच्या बाहेर पडताना या सर्व गोष्टींना पाळणे बंधनकारक आहे.
* प्रत्येका पासून किमान 6 फूट किंवा 2 मीटरचे सामाजिक अंतर ठेवावं.
* मास्कचा वापर करून नाक आणि तोंड झाकून ठेवा.
* हातांना साबण किंवा चांगल्या सेनेटाईझर ने स्वच्छ करावं.
* चेहऱ्याला हात लावू नये.
* अस्वस्थता जाणवत असल्यास घरातच राहा.
* शक्य असल्यास, घरातूनच काम करा.
* वर्दळीच्या जागी जाण्यास टाळावं.
* वेळीच योग्य तपासणी आणि औषधोपचार घ्या आणि नियमांना काटेकोर पाळा.
* ज्यांना आधीपासूनच मधुमेह, श्वसनाचे आजार, कर्करोग, मूत्रपिंडाचे आजारा सारखे इतर गंभीर आजार असल्यास, त्यांना खूपच सावधगिरी बाळगावी लागेल आणि वेळोवेळी आपल्या चिकित्सकांशी योग्य परामर्श घ्यावा.
* स्वस्थ राहण्यासाठी कुठलीही सावधगिरी उपचारांपेक्षा चांगली आहे.
सर्वे भवंतु सुखिन:,
सर्वे सन्तु निरामया:।

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘वानखेडे'तील दोन जागा गावसकर दाम्पत्यांसाठी राखीव