Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 18 April 2025
webdunia

चक्क फडणवीस यांनी सरकारच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.

Fadnavis has expressed satisfaction over the work of the government.
, शनिवार, 27 मार्च 2021 (17:03 IST)
राज्यात करोना रुग्णांचा विस्फोट झाल्याची स्थिती असून, दररोज ३० हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहे. रुग्णसंख्या वाढल्यानं सरकारने चाचण्याचं प्रमाणही वाढवलं आहे. करोना नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनेबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी समाधान व्यक्त केलं आहे.
“गेल्या १० दिवसांत सरासरी १,२६,९५० चाचण्या दररोज होत आहेत. असो, आता तरी हे सूत्र कायम ठेवा! येणार्‍या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच करोना रोखण्याचा प्रभावी उपाय होय! अधिकाधिक ९० हजारांपर्यंत आणि तेही फारच थोडके दिवस! चाचण्या वाढवा, तोच करोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे, हे वारंवार सांगूनही न ऐकणार्‍या मविआ शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या १ लाखांवर जाण्यासाठी करोनाच्या दुसर्‍या लाटेची वाट महाराष्ट्राला पहावी लागली,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वेळप्रसंगी नगर शहराचा महापौर काँग्रेसचा असेल – महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात