Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात पाच कोटी चाचण्या पूर्ण, 5,609 नवे कोरोना रुग्ण

राज्यात पाच कोटी चाचण्या पूर्ण, 5,609 नवे कोरोना रुग्ण
, गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (08:50 IST)
महाराष्ट्राने आणखी एक विक्रमी टप्पा पार केला असून, राज्यात पाच कोटी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. बुधवारी 2 लाखांहून अधिक नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात  5 हजार 560 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
 
आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 63 लाख 69 हजार 002 एवढी झाली आहे. त्यापैकी 61 लाख 66 हजार 620 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. 6 हजार 944 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
महाराष्ट्रात सध्या 64 हजार 570 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात  163 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 34 हजार 364 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.10 टक्के एवढा झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.80 टक्के एवढा झाला आहे.राज्यात आतापर्यंत 5 कोटी 01 लाख 16 हजार 137 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 13 हजार 437 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 2 हजार 860 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठा आरक्षण द्यायचं की नाही ते अशोक चव्हाणांनी स्पष्ट करावे : चंद्रकांत पाटील