Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोणतेही कार्ड नसलेल्याना मोफत पाच किलो तांदूळ

कोणतेही कार्ड नसलेल्याना मोफत पाच किलो तांदूळ
, गुरूवार, 21 मे 2020 (09:26 IST)
कोणत्याही प्रकारचं रेशन कार्ड नसलेल्यांना राज्यात मोफत पाच किलो तांदूळ  वाटण्यात येणार आहेत. अन्नधान्य पुरवठ्यासाठी कोणी अर्ज केला आहे, कोणाचा अर्ज प्रलंबित आहे किंवा असे केसरी कार्डधारक ज्यांना तांदूळही मिळत नव्हते अशा सर्वांची तहसीलदार पातळीवर यादी तयार करण्यात येणार आहे, अशी घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. 
 
केंद्र सरकारच्या आदेशाप्रमाणे आता ही सुविधा राज्यातही उपलब्ध झाली असून नागरिकांनी याबाबत प्रशासनाची संपर्क केल्यास ते मिळू शकणार असून, आता सर्व पीडित लोकांना लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात ही सुविधा उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
 
ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनाही काहीतरी अन्नधान्य पुरवठा द्या अशी जी विनंती भारत सरकारला आपण केली होती, त्या धर्तीवर आता जिल्हाधिकाऱ्यांकडे अशा लोकांना देण्याचे आदेश आले आहेत, असं भुजबळ म्हणाले. ट्विट करतही त्यांनी याबाबतची माहिती दिली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत सुमारे १४ टक्क्यानी घट